विजय शिंदे
आमदार दत्तात्रेय भरणे यांनी इंदापूर शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील मुस्लिम वस्त्यांमध्ये अनेक विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल आमदार दत्तात्रेय भरणे यांचे आभार मानून मुस्लिम बांधवांनी सत्कार केला.
इंदापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार दत्तात्रेय भरणे यांचे सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. तालुक्यामध्ये जास्तीजास्त विकास निधी खेचून आणला जात असून विकासाची घौडदौड सुरु आहे. सर्व जाती-धर्मांना बरोबर घेवून समाजातील सर्व घटकांपर्यत विकास पोहचवला जात आहे. तालुक्यातील प्रत्येक गावातील गावठाण ,वाडी-वस्तीपर्यंत विकासगंगा पोहचवली जात आहे. नुकतीच मुस्लिम वस्त्यामध्ये कब्रस्तान कंपाऊंड , पेव्हर ब्लॉक बसवणे , रस्ते करणे, दफनभूमी संरक्षण भिंत बांधणे, मशिदी समोर सभामंडप बांधणे ,इदगाह मैदान करण्यासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असुन 2515 तसेच इतर योजनेमधून 2 कोटींचा निधी मंजूर केल्याबद्दल मुस्लिम बांधवांनी आमदार दत्तात्रेय भरणे यांचा सत्कार घरी जावून सत्कार केला. यावेळी इंदापूर तालुक्यातील सर्व मुस्लिम बांधव एकत्र आले होते.यावेळी भरणे यांनी सांगितले की, समाजातील सर्व घटकांचा विकास होणे गरजेचे आहे.वाड्यावस्तीवरील अंर्तगत रस्त्यासह इतर विकासकामांना प्राधान्य देवून विकासगंगा सर्वापर्यंत पोहचवली जाणार असल्याचे सांगितले.
—