विजय शिंदे
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन (भाऊ) पाटील हे कुरवली येथे कर्मयोगी शंकररावजी पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये गुरुवारी (दि. 25 जुलै) सकाळी 8 वाजलेपासून भेटीसाठी उपलब्ध असून जनतेची व कार्यकर्त्यांशी सुसंवाद सांधणार आहेत.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे या सुसंवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांची सार्वजनिक कामे, विविध प्रश्न, अडी अडचणी जागेवर संबंधितांची संपर्क करून मार्गी लावत आहेत. त्यामुळे जनतेमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
यापूर्वी इंदापूर येथील भाग्यश्री बंगलो, बावडा येथील रत्नाई निवासस्थानी तसेच दुधगंगा दूध संघामध्ये हर्षवर्धन पाटील यांच्या वेळोवेळी झालेल्या सुसंवाद कार्यक्रमांना जनतेचा उत्स्फूर्त परिसर लाभला आहे. कुरवली येथे गुरुवारी होणाऱ्या सुसंवाद कार्यक्रमाचा लाभ जनतेने व कार्यकर्त्यांनी घ्यावा, असे आवाहन हर्षवर्धन पाटील संपर्क कार्यालय इंदापूर, यांचेकडून करण्यात आले आहे.
__________________________