विजय शिंदे
ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत इंदापूर तालुक्यातील चिखली गावात कृषी महाविद्यालय बारामती येथील कृषी दुतांनी माती परीक्षणासाठी मातीचा नमुना घेताना तो एक ठिकाणावरून न घेता शेतातून वेगवेगळ्या ठिकाणाहून शास्त्रीय पद्धतीने कसा घ्यावा व नमुना घेताना कोणकोणती काळजी घ्यावी याबाबत प्रात्यक्षिकांमधून माहिती देण्यात आली.
या प्रात्यक्षिक दरम्यान माती परीक्षण करणे का गरजेचे आहे याचे महत्त्व कृषी दुतांनी उपस्थित शेतकऱ्यांना पटवून दिले. तसेच माती परीक्षण अहवालानुसार खताचे व्यवस्थापन कसे करता येईल याची ही माहिती कृषी दुतांनी दिली. यावेळी केंद्र शासनाचा मृदा आरोग्य पत्रिका योजनेची माहिती देण्यात आली. यावेळी आर्यन गायकवाड, निखिल गायकवाड, यशोधन खटके,आर्यन लाळगे,ओंकार मेणकर, ओंकार बंडगर, सुदर्शन कारळे हे विद्यार्थी उपस्थित होते.