दहा नगरपरिषद कर्मचा-यांच्या वारसांना नियुक्तीपत्रे; रिपाइंचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब सरवदे यांच्या प्रयत्नांना यश.

विजय शिंदे 

रिपाइंचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब सरवदे यांनी केलेला पाठपुरावा, आ. दत्तात्रय भरणे यांनी केलेले सहकार्य यामुळे लाड,पागे शिफारशीनुसार इंदापूर नगरपरिषदेच्या दहा कर्मचाऱ्यांच्या वारसांना इंदापूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमेश ढगे यांनी नियुक्तीपत्रे दिली. या सर्वांची नोकरीचा प्रश्न सुटला आहे.

लाड पागे यांच्या शिफारशीनुसार इंदापूर नगरपरिषदेच्या सेवेत कायम असणा-या निवृत्त व मयत झालेल्या दहा कर्मचाऱ्यांच्या वारसांच्या नियुक्तीचा प्रश्न गेल्या सहा सात वर्षांपासून प्रलंबित होता. त्यांची नियुक्ती व्हावी यासाठी रिपाइंचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब सरवदे हे दीर्घकाळ पाठपुरावा करत होते.


हा प्रश्न त्यांनी आ.दत्तात्रय भरणे यांच्या निदर्शनास आणून दिला होता. नव्यानेच रुजू झालेले इंदापूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमेश ढगे यांच्या संपर्कात राहून तो प्रश्न सोडवण्यासाठी ते प्रयत्नशील होते. अखेर त्यांच्या प्रयत्नाना यश मिळाले.बुधवारी (दि. २४) एका छोटेखानी कार्यक्रमात त्या कर्मचाऱ्यांच्या दहा वारसांना मुख्याधिकारी ढगे यांनी नियुक्तीपत्रे दिली.

माजी उपनगराध्यक्ष अरविंद वाघ,रिपाइंचे जिल्हा कार्याध्यक्ष शिवाजीराव मखरे,सरचिटणीस संदिपान कडवळे,तालुका कार्याध्यक्ष नितीन झेंडे नियुक्त कर्मचाऱ्यांचे नातेवाईक, नगरपरिषदेचे कर्मचारी या वेळी उपस्थित होते.

बाळासाहेब सरवदे यांनी दहा जणांसह एकूण सतरा वारसांच्या नोकरीचा प्रश्न सोडवला आहे. नव्याने नियुक्ती पत्र मिळालेल्या या कर्मचाऱ्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरनगर मधील जेतवन बुध्द विहारात आनंदोत्सव साजरा केला.

आ.दत्तात्रय भरणे यांनी त्या कर्मचा-यांच्या वारसांचे प्रश्न समजून घेतले. मुख्याधिकारी रमेश ढगे यांनी आपल्या प्रयत्नाला कृतीतून साथ दिली त्यामुळे हा प्रश्न सुटला. : बाळासाहेब सरवदे, तालुकाध्यक्ष रिपाइं
________________________________________

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here