विजय शिंदे
इंदापूर तालुक्यातील मुलींना मोफत उच्च शिक्षण मिळावे याकरिता इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ, शहाजीराव पाटील विकास प्रतिष्ठान वनगळी व शिवाजी एज्युकेशन सोसायटी बावडा यांच्या वतीने उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींच्या मोफत शिक्षण योजनेच्या अंमलबजावणी बाबत विद्यार्थी व पालक यांच्याशी ऑनलाइन संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या ऑनलाइन संवाद कार्यक्रमांमध्ये राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील व राज्याचे माजी मंत्री व संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेचे संचालक युवा नेते राजवर्धन पाटील उपस्थित होते.
यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुलींच्या मोफत उच्च शिक्षणासंबंधी सरकारी योजनेची माहिती विद्यार्थिनींना दिली. ऑनलाइन विद्यार्थिनींच्या प्रश्नांना देखील चंद्रकांतदादा पाटील यांनी उत्तरे देत त्यांचे समाधान केले.
राजवर्धन पाटील म्हणाले की,’ सरकारच्या या धोरणामुळे मुलींच्या उच्च शिक्षणासाठी मोलाचे सहकार्य होणार आहे.’यावेळी राजवर्धन पाटील यांच्या हस्ते नव मतदार नोंदणीसाठी विध्यार्थीनीना अर्जाचे वाटप करण्यात आले.
उप प्राचार्य प्रा. दत्तात्रय गोळे , डॉ. भरत भुजबळ,प्रा. उत्तम माने तसेच प्राध्यापक वर्ग यावेळी उपस्थित होते.