विजय शिंदे
बारामती लोकसभा मतदार संघातील निवडणुकीचा जोर वाढू लागला आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमोर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे आव्हान उभे राहिले आहे. सुप्रिया सुळे व सुनेत्रा पवार या इंदापूर तालुक्यातील अनेक मातब्बर नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत, इंदापूर तालुक्याचे माजी आमदार स्वर्गीय राजेंद्रकुमार घोलप यांच्या कुटुंबीयांची भेट घेत सुनेत्रा पवार यांनी आपल्या इंदापूर तालुक्याच्या दौऱ्याची सुरुवात केली. अनेक दिवस राजकीय कार्यक्रमापासून अलिप्त असणारे घोलप कुटुंबीय खासदार सुळे यांना मदत करणार की.? उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना.? याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.
सुनेत्रा पवार यांची फेसबुक पोस्ट..
इंदापूर तालुका दौऱ्याची सुरुवात घोलप कुटुंबियांच्या भेटीने”
माजी आमदार स्व. राजेंद्रकुमार घोलप यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी स्नेह जपला होता. त्यांच्या कन्या स्व. संगीता ढवाण पाटील माझ्या अत्यंत जिवलग मैत्रीण होत्या. या साऱ्या आठवणींना यावेळी उजाळा मिळाला. जुने फोटो पाहताना त्या काळात मन रमलं.
यावेळी आईसाहेब सुनंदादेवी घोलप, छत्रपती कारखान्याचे माजी चेअरमन अविनाशदादा घोलप, माजी सभापती करण घोलप, बालाजी घोलप, सौ. वंदनादेवी, सौ. पुजादेवी तसेच त्यांचे आप्त, स्नेही उपस्थित होते. आईसाहेबांनी दिलेले आशीर्वाद तर इतर सर्वांनी दिलेल्या सदिच्छाबद्दल मनापासून आभार.