विजय शिंदे
राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या खंडाळी (ता. माळशिरस) गावच्या उपसरपंचपदी रिकेश रामचंद्र चव्हाण यांची शुक्रवारी (दि. २६) बिनविरोध निवड करण्यात आली.
ठरल्याप्रमाणे यापूर्वीच्या उपसरपंच सुरेखा विठ्ठल पताळे यांनी आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे रिक्त जागी उपसरपंचपदी रिकेश चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यापूर्वी त्यांनी विद्यमान सदस्य असताना गावच्या विकासामध्ये कायम आग्रही पुढाकार घेतला होता. त्यामुळे त्यांना उपसरपंच पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
यावेळी सरपंच सुनिता सुरवसे, सुरेश सुरवसे, माजी उपसरपंच सुरेखा पताळे, विठ्ठल पताळे, समाधान पताळे, शिवाजी शिंदे, अनिल भोसले, बाबुराव पताळे, ग्रामसेवक सत्यवान पवार, क्लार्क शिवाजी साबळे, पांडुरंग किर्दकर सर्व सदस्य व गावतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
——
वेळू ग्रामपंचायत सदस्य म्हणून ही माझी पहिलीच टर्म आहे. मात्र इतर सहकारी व त्यांचा अनुभव मार्गदर्शन घेऊन मी गावचा विकास करण्याचा प्रयत्न करेन. यापुढेही विविध योजना आणून गावाचा विकास करण्यासाठी मी कटिबद्ध असेन माझ्या सहकाऱ्यांनी व ग्रामस्थांनी माझ्यावर विश्वास टाकलाय त्या बद्दल मी माझ्या सर्व सहकाऱ्यांचे व ग्रामस्थांचे आभार मानतो.रिकेश चव्हाण, उपसरपंच