विजय शिंदे
इंदापूर शहरातील नामवंत अशा मगर ॲक्सिडेंट व डोळ्यांचे हॉस्पिटलचे कृष्णदृष्टी ॲडव्हांस आय केअर सेंटर च्या प्रथम वर्धापनदिन निमित्ताने, महाशिवरात्री चे औचित्य साधून शुक्रवार दिनांक ८ मार्च रोजी सकाळी १० वाजता मधुमेही व रक्तदाब रुग्णांसाठी डोळ्याच्या मागील पडद्याचा (रेटिना) मोफत स्कॅन कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती डॉ समीर मगर यांनी दिली.
या साठी अरविंद नेत्रालय मदुराई येथील अनुभवी दृष्टीपटल(रेटिना) तज्ञ डॉ. पूजा वाबळे – पवार (MBBS., DNB (Ophthal) FVRS, FAEH) यांच्या द्वारा मोफत दृष्टी पटल तपासणी व मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिराचा लाभ घेऊन भविष्यात उद्भवणारे कायमचे अंधत्व व इतर गंभीर दुष्परिणाम टाळा असे आवाहन डॉ मगर यांनी केले.
स्थळ.:मगर ॲक्सीडेंट व डोळ्यांचे हॉस्पिटल.कृष्णदृष्टी ॲडव्हान्स आय केअर.कालठण रोड, इंदापूर.वेळ – सकाळी १०:०० ते दुपारी ०३:०० वा पर्यत.अधिक माहितीसाठी संपर्क- 9595696196/ 9505875404.