विजय शिंदे
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज छाननी प्रक्रियेस सुरुवात झाली असून जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या निर्देशानुसार सर्व तालुक्यात प्राप्त अर्जाची छाननी प्रक्रिया सुरू झाली आहे. ही प्रक्रिया प्रत्येक पात्र महिलेचा अर्ज तपासून तिला लाभ मिळेपर्यंत सुरू राहणार आहे.
अर्जात त्रुटी असल्यास अशा महिलांनी भ्रमणध्वनीवर प्राप्त झालेल्या संदेशाचे व्यवस्थितरित्या वाचन करून त्या संदेशात दिलेल्या सूचनेप्रमाणे अर्जात दुरुस्ती करावी तसेच मागणी केलेली कागदपत्रे जोडून अर्ज फेरसादर करावा. जिल्ह्यातील या अर्जाव्यतिरिक्त उर्वरित पात्र महिलांनी ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मोनिका रंधवे यांनी केले आहे.
पात्र महिलांना वेळेवर लाभ मिळावा यासाठी अर्ज भरून घेण्यासोबत अर्जाची छाननी सुरू करण्यात आल आहे. अर्जात त्रुटी असल्यास दुरुस्ती करण्याही संधी आहे. प्रत्येक पात्र महिलेला लाभ देण्यात येईल.