दहावीत शिकणाऱ्या मुलाचा हृदयविकाराच्या धक्क्याने शाळेतच मृत्यू.

विजय शिंदे 

इंदापूरच्या श्री.नारायणदास रामदास हायस्कूल येथील इयत्ता दहावीत शिकणाऱ्या मुलाचा हृदयविकाराच्या धक्क्याने शाळेतच मृत्यू
इंदापुर येथील श्री. नारायणदास रामदास हायस्कूल मधील इयत्ता दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा शाळेतच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून प्रथमेश विकास खबाले (वय 16 वर्षे, रा.भाटनिमगाव,ता.इंदापूर) असं मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण इंदापूर तालुक्यातून हळहळ व्यक् होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, प्रथमेश विकास खबाले हा श्री नारायणदास रामदास हायस्कूल येथे इयत्ता दहावी शिकणारा विद्यार्थी दुपारी शाळेत आल्यानंतर दररोजच्या प्रमाणे शाळेच्या प्रांगणात सामूहिक प्रार्थना झाल्यानंतर हा विद्यार्थी वर्गात गेला.त्यानंतर बाकावर बसल्यानंतर त्याला चक्कर आली. शिक्षकांनी त्यास इंदापूर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. त्यानंतर इंदापूर उपजिल्हा रुग्णालय येथे शवविच्छेदन करण्यात आले..

अत्यंत शोकाकुल वातावरणात प्रथमेश वर भाटनिमगाव येथील खबाले वस्ती  येथे सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.

-भाटनिमगाव ग्रामपंचायतच्या माजी सरपंच अर्चना अजित खबाले यांचे ते पुतणे आहेत,ही दुःखद वार्ता कळतात गावात शोककळा पसरली. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार दत्तात्रय भरणे,अंकिता पाटील, प्रविण माने,आप्पासाहेब जगदाळे, भरत शहा, मुकुंद शहा, विलासराव वाघमोडे, बाळासाहेब ढवळे, सतिश पांढरे,मुख्याध्यापक संजय सोरटे, ग्रामसेवक नीलेश यादव यांनी दुःख व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here