भिगवण प्रतिनिधी – अमोलभोंग
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ 21 ते 65 वयोगटातील सर्व पात्र लाभार्थी महिलांनी घ्यावा त्यामुळे महिलांना आर्थिक पाठबल मिळणार आहे.असे आवाहन इंदापूर तालुका लाडकी बहीण योजनेचे अध्यक्ष व इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी मौजे डिकसळ येथील कार्यक्रमात केले.
आज लाडकी बहीण योजनेसाठी आयोजित शिबिराचे उदघाटन आ भरणे यांच्या हस्ते झाले.त्यावेळी ते बोलत होते. या वेळीं ते म्हणाले या योजनेने इंदापूर तालुक्याला साधारण 1 लाख 5 हजार महिलांना याचा लाभ मिळणार आहे. महिन्याला 1500 रू. प्रमाणे 15.5 कोट रू आणि वर्षाला साधारण 185 ते 190 कोटी रू आणि दिवसाला या योजनानेतून 55 लाख रू महिलांना मिळणार आहे. या योजने पासून एकही पात्र लाभार्थी यापासून वंचित राहणार नाही यासाठी या शिबिरातील सर्व अंगणवाडी सेविका,अशा वर्कर, कार्यकर्ते यांनी सहकार्य करावे.
या वेळीं पी डी. सी. बँक शाखा भिगवण च्या वतीने झिरो रुपयात खाते खोलले जात होते.रेशन कार्डच्या काही अडचणी असल्यास त्यासाठी महसूल विभागाचे कर्मचारी यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन त्यांनी केले.यावेळी होते तहसीलदार श्रीकांत पाटील, गटविकास अधिकारी सचिन खुडे,विस्तार अधिकारी.बी. बी. खोमणे, अमोल मेरगळ, भिगवण मंडल अधिकारी दिपक कोकरे व तसेच तलाठी राहुल देवरे, डिकसळ ग्रामपंचायत सरपंच. मनिषा गवळी, उपसरपंच मंदा शिंदे ग्रामसेविका . प्रतिभा देवकाते व ग्रामपंचायतचे सर्व सदस्य व ग्रामस्थ महिला व पुरुष मोठया संखेने उपस्थित होते.सूत्रसंचालन श्री. दराडे सर मुख्याध्यापक जि. प. प्राथमिक शाळा डिकसळ यांनी केले.