विजय शिंदे
२२ जानेवारी २०२४ रोजी उणे झालेले उजनी धरण २५ जुलैपर्यंत उणे पातळीतच होते. पुणे जिल्ह्यातील पावसामुळे धरण आता ९० टक्क्यांपर्यंत आले आहे. धरणातील एकूण पाणीसाठा आता ११० टीएमसी इतका झाला आहे.धरणात सध्या दौंडवरुन ७५ हजार क्युसेकने पाण्याची आवक येत आहे.
त्यामुळे आता धरणातून डावा- उजवा कॅनॉल, बार्शी, दहीगाव उपसा सिंचन योजना, बोगदा, सीना नदीतून पाणी सोडले जाणार आहे. विसर्ग असाच राहिला किंवा यापेक्षा वाढला तर भीमा नदीतूनही पाणी सोडले जाईल, असे जलसंपदा विभागाने सांगितले आहे.
भीमा, सीना नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
उजनी धरणात सध्या उपयुक्त पाणीसाठा ४६ टीएमसीपर्यंत (९० टक्क्यांपर्यंत) पोचला आहे.