अजित दादांच्या आमदारांना साहेबांची भीती.? विधानसभेसाठी इच्छुक पुत्राला घेऊन आमदार शरद पवारांच्या भेटीला.

विजय शिंदे 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अजित पवार गटाचे माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनदादा शिंदे आणि त्यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे हे शरद पवार यांच्या भेटीसाठी आले आहेत.

पुण्यातील मोदी बाग इथं बबनदादा शिंदे आणि रणजितसिंह शिंदे पोहोचले आहे. त्यामुळं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. अजित पवार गटाचे आणखी एक आमदार शरद पवार गटात घरवापसी करणार का? असा सवाल उपस्थित केला जातोय.

शरद पवार हे सध्या पुण्यातील मोदी बागेमध्ये आहेत. या ठिकाणी अनेकजण शरद पवार यांची भेट घेण्यासाठी आले आहेत. अशातच माढा तालुक्याचे आमदार बबनदादा शिंदे आणि त्यांचे पुत्र रणजिससिंह शिंदे शरद पवार यांना भेटण्यासाठी आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. या भेटीमुळं अजित पवार गटाला मोठा धक्का मानला जातोय. कारण आमदार बबनराव शिंदे शरद पवार गटात घरवापसी करणार का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे हे माढा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. तर त्यांच्या विरोधात त्यांचे चुलत बंधू धनराज शिंदे निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत. आमदार बबनदादा शिंदे यांचे बंधू रमेश शिंदे यांनी काही दिवसापूर्वी खासदार सुप्रिया सुळेंची भेट घेतली होती. तर आमदार बबदादा शिंदे यांचे पुतणे धनराज शिंदे यांनी रोहित पवार यांचे वडिल राजेद्र पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळं राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु होती. दरम्यान, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांची तुतारी कोणाला मिळणार? याची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here