इंदापुरात पशुवैद्यकीय क्षेत्रातील सर्व डॉक्टरांचे काम कौतुकास्पद; हर्षवर्धन पाटील.

विजय शिंदे 

इंदापूर तालुक्यातील शासकीय व निमशासकीय सेवेत असलेल्या पशुवैद्यकीय क्षेत्रातील सर्व डॉक्टरांचे काम कौतुकास्पद असून अडचणीच्या काळातही हे सर्वजण पशु व पालकांच्या मदतीला धावून जातात तसेच इंदापूर तालुक्यातील वाढत्या दूध उत्पादनात या सर्व पशुसंवर्धन विभागातील डॉक्टर अधिकारी व कर्मचारी यांचे योगदान मोठे असल्याचे उद्गार माजी मंत्री व राष्ट्रीय सहकारी साखर संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी काढले

इंदापूर येथे स्वराज प्रतिष्ठान आयोजित स्वराज ऍग्रोवेट च्या १५ व्या वर्धापन दिनानिमित्त पशुवैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पशुवैद्यकीय डॉक्टरांचा सन्मान सोहळा(२ ऑगस्ट) आयोजित केला होता त्यावेळी ते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले इंदापुरातील पशुवैद्यकीय डॉक्टर हे मागणारे नसून देणारे आहेत, ते अडचणीच्या काळात पशुपालकांच्या मदतीला धावून जातात. इंदापूर तालुक्यातील दूध उत्पादनाच्या बाबतीत या सर्व वैद्यकीय कर्मचारी अधिकाऱ्यांचे योगदान मोठे आहे. पशुवैद्यकीय सेवा करत असताना  काही अडचण उद्भवल्यास सरकार दरबारी मांडून पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री यांच्या माध्यमातून आपले प्रश्न सोडवले जातील.

हा कार्यक्रम स्वराज प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष स्वप्निल सावंत यांनी आयोजित केलेला होता. यावेळी पशुवैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल पशुवैद्यकीय डॉक्टरांचे सन्मान करण्यात आले यावेळी डॉ विनोद होनाळीकर सेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन विभाग यांना जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला. त्याचबरोबर डॉ लक्ष्मण आसबे यांना पशुवैद्यकीय व सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल विशेष सन्मानित करण्यात आले. या वेळीं बावडा गावचे सुपुत्र डॉक्टर संजय शिंदे यांची नुकतीच सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र राज्य निवड झाल्याबद्दल त्यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. तसेच शासकीय व निमशासकीय सेवेत असलेल्या पशुवैद्यकीय क्षेत्रातील पशुवैद्यकीय डॉक्टरांचा सन्मान माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी वेदांत घोरपडे या युवकाचा ही रस्त्यावरील प्राण्यांना चा जीव वाचवण्या साठी करत असलेल्या कार्याबद्दल स्वराज प्रतिष्ठान तर्फे विशेष सन्मानित करण्यात आले. या वेळीं स्वराज ऍग्रोवेट च्या दर्जेदार उत्पादनांचे हर्षवर्धन पाटल यांनी कौतुक केले. त्याचबरोबर स्वराज उद्योग समूहाच्या माध्यमातून पशुवैद्यकीय क्षेत्रामध्ये पूर्वत असलेल्या विविध सोयींचेही कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here