विजय शिंदे
इंदापूर येथे कर्मयोगी श्रद्धेय शंकररावजी पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्ताने कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे उपस्थितीमध्ये समाजभूषण डॉ. लक्ष्मण आसबे यांच्या व्याख्यानाचे शुक्रवार (दि.8 मार्च) सकाळी 8.30 वा. आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी कर्मयोगी शंकररावजी पाटील यांच्या समाधीस्थळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करतील. त्यानंतर समाजभूषण डॉ. लक्ष्मण आसबे यांचे व्याख्यान होईल. तरी सदर कार्यक्रमास नागरिकांनी तसेच सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहण्याचे आवाहन इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाने केले आहे.