विजय शिंदे
पुरवठा शाखा इंदापूर येथील झिरो कर्मचारी तथा उमेदवार यांची कसून चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी लहुजी शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ जगताप यांनी केली आहे.
यावेळी जगताप म्हणाले इंदापूर तहसील कचेरीतील पुरवठा विभागात एजंट मार्फत सामान्य नागरिकांना त्रास दिला जातो,याची चौकशी करण्यात यावी.
पुरवठा शाखेतील त्यांना सामील असलेले पुरवठा निरीक्षक यांना पुरवठा शाखेच्या दरवाजासमोर बसून नागरिकांचा झिरो कर्मचाऱ्यांची संपर्क बंद करण्यात यावा. इंदापूर तहसिलच्या अभिलेख कक्षामध्ये जी व्यवस्था करण्यात आली आहे. त्याप्रमाणेच व्यवस्था पुरवठा शाखेमध्ये करण्यात यावी.
अन्यथा या समस्येकडे शासनाचे गंभीरपणे लक्ष वेधण्यासाठी नाईलाज असतो संघटनेच्या वतीने आंदोलन केले जाईल असे पुणे जिल्हा लहुजी शक्ती सेना संघटनेचे अध्यक्ष दत्ताभाऊ जगताप म्हणाले.