विजय शिंदे
जिजाऊ फेडरेशन च्या माध्यमातून इंदापुरात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.शुक्रवार दिनांक १६ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेर्यंत कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय इंदापूर येथे नोकरी पूर्व मुलाखत शबिर पार पडणार आहे.पुणे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या अंकिता पाटील ठाकरे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवला जाणार आहे .
या मेळाव्यातून तालुक्यातील युवकांना रोजगार निर्मिती होणार आहे. एकाच छताखाली सर्व कंपन्या येणार असल्याने पाहिजे त्या ठिकाणी संधी उपलब्ध होणार आहे. युवकांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार काम करण्याची संधी मिळणार आहे.
१२ ऑगस्ट रोजी कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय भिगवन येथे तर मंगळवार दिनांक १३ ऑगस्ट रोजी रत्नप्रभादेवी पाटील महाविद्यालय बावडा येथे तर १४ ऑगस्ट रोजी कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय इंदापूर येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी सर्व इच्छुकांनी आपल्या बायोडाटा आणि सर्व आवश्यक कागदपत्रासह उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.