प्रवीण माने यांच्या हस्ते नंदीकेश्वर मंदिरात अभिषेक..

विजय शिंदे 

इंदापूर तालुक्यातील निरवांगी येथील श्री नंदीकेश्वर मंदिर येथे श्रावणातील पहिल्या सोमवारी भाविकांनी पवित्र शिवलिंगाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. मंदिर
परिसरात भोलेनाथाच्या जयघोषाने परिसर दुमदुमला होता.

उपासना, श्रद्धा व भक्तीचा पवित्र महिना असलेल्या श्रावण महिना आरंभ झाला असून श्रावणी सोमवारच्या निमित्ताने तालुक्यातील निरवांगी येथील प्रसिद्ध देवस्थान श्री नंदीकेश्वर मंदिर येथे पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांनी मनोभावे दर्शन घेऊन अभिषेक केला.

यावेळी इंदापूर तालुक्यात समाधानकारक पाऊस पडावा, सर्वत्र सुख शांती नांदावी यासाठी त्यांनी साकडे घातले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here