महाविकास आघाडीतील शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सामोरे जाण्याचं आव्हान; सोबतच महायुतीतील बंडखोरी टाळण्याचे आवाहन अजित पवार यांच्यासमोर.

विजय शिंदे 

आगामी विधानसभा निवडणुकांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कंबर कसली असून त्यांचा महाराष्ट्र दौरा सुरू होत आहे. महायुतीमध्ये जागावाटपापासून उमेदवार निवडून आणेपर्यंत त्यांना आता रणनीती आखायची आहे.

मात्र, तत्पूर्वी जागावाटपात अधिकाधिक जागा आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी अजित पवारांची कसरत होणार आहे. कारण, लोकसभेला ४८ पैकी केवळ ४ मतदारसंघात त्यांनी उमेदवार उभे केले होते. त्यापैकी, रायगड लोकसभा मतदारसंघातच त्यांना विजय मिळाला. त्यामुळे, आगामी विधानसभा निवडणुकांत त्यांना ताकद दाखवावी लागणार आहे. मात्र, महाविकास आघाडीतील शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सामोरे जाण्याचं आव्हान अजित पवारांसमोर आहेत. त्यातच, महायुतीतील जागावाटपानंतर तब्बल १८ मतदारसंघात बंडखोरी होण्याची शक्यता प्रथमदर्शनी दिसून येत आहे. त्यामुळे, अजित पवारांनी डोकेदु:खी वाढणार आहे.

आगामी विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या १८ विद्यमान आमदारांच्या विधानसभा मतदार संघामध्ये बंडखोरी होण्याची शक्यता दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मावळ,दिंडोरी,कागल, इंदापूर,वडगाव शेरी, आष्टी,कोपरगाव, अहेरी,अकोले,पूसद,जुन्नर,वाई यातील मतदार संघात महायुतीमध्ये सध्या धुसफूस सुरू आहे. महायुतीमधील अनेक नेते हे निवडणुकीच्या काळात महाविकास आघाडीच्या गळाला लागण्याची शक्यता आहे. कारण, जागावाटपात भाजपचं पारडं जड असून अनेक मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षातील आमदारांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता आहे. या बंडखोरीच्या शक्यतेमुळे महायुतीमधील पक्षांच्या प्रमुख नेत्यांची डोकेदुखी वाढणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महायुतीमधील वादातीत १८ मतदारसंघ कोणते?

दिंडोरी- नरहरी झिरवाळ विरुद्ध शिवसेना माजी आमदार धनराज महाले-

कागल- हसन मुश्रीफ विरुद्ध समरजीत घाटगे (भाजप)

चंदगड- राजेश पाटील विरुद्ध शिवाजी पाटील (भाजप )

मावळ- सुनील शेळके विरुद्ध भाजपचे माजी मंत्री बाळा भेगडे

इंदापूर- दत्तामामा भरणे विरुद्ध हर्षवर्धन पाटील

वडगाव शेरी- सुनील टिंगरे विरुद्ध जगदीश मुळीक (भाजप)

हडपसर- चेतन तुपे विरुद्ध महादेव बाबर (शिवसेना शिंदे)

आष्टी- बाळासाहेब आजबे विरुद्ध सुरेश धस (भाजप)

कोपरगाव- आशुतोष काळे विरुद्ध विवेक कोल्हे (भाजप)

अर्जुनी मोरगाव- मनोहर चंद्रिकापुरे विरुद्ध माजी मंत्री राजकुमार बडोले (भाजप)

अहिरी- धर्मरावबाबा अत्राम विरुद्ध अमरिश राजे (भाजप)

पुसद- इंद्रनील नाईक विरुद्ध भाजप आमदार नीलय नाईक

अकोले- किरण लहामटे विरुद्ध वैभव पिचड (भाजप)

येवला- छगन भुजबळ विरुद्ध अमृता पवार (भाजप)

अमळनेर- अनिल पाटील विरुद्ध माजी आमदार शिऱिष चौधरी (भाजप)

सिंदखेड राजा- राजेंद्र शिंगणे विरुद्ध शशिकांत खेडेकर (शिवसेना)

जुन्नर- अतुल बेनके विरुद्ध शरद सोनवणे (शिंदे)

वाई- मकरंद पाटील विरुद्ध मदन भोसले (भाजप)

Author : निलेश बुधावले, एबीपी माझा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here