राज्यसभेच्या देशभरातील १२ जागांसाठी पोटनिवडणूक जाहिर.

विजय शिंदे 

राज्यसभेच्या देशभरातील १२ जागांसाठी पोटनिवडणूक पार पडणार आहे. निवडणूक आयोगानं ही निवडणूक जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील दोन जागांचा समावेश आहे. ही निवडणूक ३ सप्टेंबर रोजी पार पडणार आहे.

कसं आहे निवडणुकीचं शेड्युल?

नोटिफिकेशन तारीख – बुधवार, १४ ऑगस्ट २०२४

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख – बुधवार, २१ ऑगस्ट २०२४

उमेदवारांची छाननी – गुरुवार, २२ ऑगस्ट २०२४

अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख – सोमवार, २६ ऑगस्ट २०२४ (आसाम, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि त्रिपुरा) आणि मंगळवार २७ ऑगस्ट २०२४ (बिहार, हरयाणा, राजस्थान, तेलंगाणा, ओडिशा)

निवडणुकीची तारीख – मंगळवार, ३ सप्टेंबर २०२४

मतदानाची वेळ – सकाळी ९ ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत

मतमोजणी तारीख – मंगळवार, ३ सप्टेंबर २०२४ संध्याकाळी ५ वाजता

या तारखेपर्यंत निवडणूक पार पडणार – शुक्रवार, ६ सप्टेंबर २०२४

महाराष्ट्रातील ‘या’ जागांसह होणार निवडणूक

राज्यसभेच्या खासदारांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुका लढवल्या आणि जिंकल्यानं १२ जागा रिक्त झाल्या आहेत. त्यामुळं या जागांवर पोटनिवडणूक लागली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील उदयनराजे भोसले आणि पियुष गोयल या सदस्यांच्या जागा रिक्त आहेत. यामध्ये उदयनराजे यांची टर्म २ एप्रिल २०२६ पर्यंत आहे. तर पियुष गोयल यांची टर्म ४ जुलै २०२८ पर्यंत होती.

त्याचबरोबर कामाख्या प्रसाद तासा (आसाम), सर्बानंदा सोनोवाल (आसाम), मिशा भारती (बिहार), विवेक ठाकूर (बिहार), दिपिंदर सिंह हुडा (हरयाणा), ज्योतिरादित्य सिंधिया (मध्य प्रदेश), केसी वेणुगोपाल (राजस्थान), बिप्लव कुमार देब (त्रिपुरा), डॉ. के. केशव राव (तेलंगाणा), ममता मोहंता (ओडिशा).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here