विजय शिंदे
लाडकी बहीण योजनेचा लाभ इंदापूर तालुक्यातील पात्र लाभार्थी महिलांना मिळाला पाहिजे यापासून कोणीही वंचित राहू नये याची दक्षता घ्या अशी चर्चा इंदापूरचे नवीन तहसीलदार जीवन बनसुडे यांच्यासोबत झाली असल्याची माहिती माजी मंत्री व राष्ट्रीय सहकारी साखर संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी दिली.पाटील यांनी इंदापूर तालुक्यातील निरवांगी येथील नंदिकेश्वर मंदिरात दर्शन घेतले यावेळी ते बोलत होते.
यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले लाडकी बहीण ही योजना शासनाची असून ऑनलाइन भरलेल्या अर्जातून एकही महिला लाभापासून वंचित राहू नये याची काळजी घ्या.
तहसील कार्यालयात रेशन कार्ड विभक्त करायला गेले तरी सामान्य माणसाला त्याचा त्रास होत आहे. नवीन रेशन कार्ड वरती नाव नोंदवायचं असेल तर होत नाही, एखाद्याच रेशन कार्ड वरचं नाव कमी करणे किंवा वाढवणे हे सुद्धा सामान्य माणसाला याचा त्रास सहन करावा लागतो आहे, यामध्ये लक्ष घालून प्रशासन सुलभ करण्यात यावं अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी नंदिकेश्वर मंदिरात दर्शन घेऊन अभिषेक केला.