विजय शिंदे.
भीमा नदीकाठी वसलेल्या भाटनिमगाव (ता. इंदापूर) येथे सोमवार )दि१२) पासून श्रावणी अखंड हरिनाम सप्ताह व भव्य ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला सुरुवात झाली. भजनी मंडळ व ग्रामस्थांच्या उपस्थितीत साहित्य पूजन व गाथा पूजन करण्यात आले.अखंड हरिनाम सप्ताह व भव्य दिव्य ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे हे पंधरावे वर्ष आहे.दिनांक १२ ऑगस्ट पासून १९ ऑगस्टपर्यंत हरिनामाचा जागर होणार आहे.
यावेळी राज्यभरातील नामवंत कीर्तनकार येथील अखंड हरिनाम सप्ताहात हरी नामाचा जागरण करतात, तसेच या वेळी भजन, हरिपाठ, प्रवचन,कीर्तन व सांप्रदायिक सोंगी भारुड तसेच दिपोस्तव व दिंडी प्रदक्षिणा केली जाते. अखंड हरिनाम सप्ताह च्या काळात अन्नदात्यांकडून अल्पोहार व अन्नदानपंक्तीचे आयोजन केले जाते, या हरिनाम सप्ताहाचे वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते.(शनिवार १७ रोजी रक्तदान शिबिर)
यावर्षीच्या खंड हरिनाम सप्ताह हभप प्रदीप महाराज जाधव कविटगाव,ह भ प रोहिदास महाराज मस्के,ह भ प हनुमंत महाराज गंगथडे ,ह भ प विशाल महाराज इंदलकर,ह भ प संतोष महाराज मगर,ह भ प महेश महाराज मडके,ह भ प लक्ष्मण महाराज कोकाटे यांचे कीर्तन होणार आहे तसेच अखंड हरिनाम सप्ताहाच्या शेवटाला (दिनांक १९) काल्याचे किर्तन जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे वंशज ह भ प बापूसाहेब महाराज मोरे देहूकर यांचे होणार आहे.
या अखंड हरिनाम सप्ताहात सहभागी होण्याचे आवाहन व्यासपीठ चालक ह भ प संतोष मगर महाराज यांनी केले आहे.