नोकरी महोत्सवामध्ये युवक वर्गाने सहभागी होऊन रोजगाराची संधी प्राप्त करावी – अंकिता पाटील- ठाकरे

विजय शिंदे

जिजाऊ फेडरेशनच्या वतीने राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापूर येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये शुक्रवार दि.16 ऑगस्ट रोजी भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन केले आहे. या नोकरी महोत्सवामध्ये राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्यरत 50 पेक्षा जास्त कंपन्या सहभागी होऊन युवकांना रोजगार प्राप्त करून देणार आहेत.

विविध विद्याशाखेतील युवक युवतींनी आपल्या आवश्यक कागदपत्रासह सहभागी होऊन या नोकरी महोत्सवातच आपली रोजगाराची संधी निश्चित करावी असे आवाहन पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे यांनी केले.
रेड्डी फाऊंडेशन, बजाज ऑटो, टाटा मोटर्स, भारत गियर्स, डूथ ऑटोमेटिव्ह, ॲक्सिस बँक, मुटूथ फायनान्स, एलआयसी, रॉयल इन्फोटेक, जिनियस कन्सल्टंट, आर35 सिक्युरिटीज अर्णव इन्फो यासारख्या 50 पेक्षा जास्त कंपन्या या नोकरी महोत्सवामध्ये सहभागी होऊन युवकांना रोजगार उपलब्ध करून देणार आहेत.

या कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते 16 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजता होणार आहे. यावेळी युवा नेते राजवर्धन पाटील व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here