विजय शिंदे
स्व. मंगेश (बाबा) पाटील यांच्या जयंतीच्या निमित्ताने जि.प.प्राथमिक शाळा १/२ इंदापूर या ठिकाणी स्व.मंगेश (बाबा) यांची जयंतीच्या निमित्ताने प्राथमिक शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनींना परीक्षा पॅड वाटप करण्यात आले. इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भाग तसेच इंदापूर शहरांमध्ये मंगेश (बाबा) हयात असताना अनेक असे सामाजिक उपक्रम राबवले जायचे त्यांचाच वसा आणि वारसा घेऊन त्यांचे कार्य पुढे अखंड चालू ठेवून इंदापूर शहरांमध्ये आणि तालुक्यामध्ये पुढे चालू ठेवण्याचं काम त्यांच्या स्मृतींना आणि त्यांच्या आठवणीला ऊजाळा देण्याचे काम सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून स्व.मंगेश (बाबा) प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येते.
या कार्यक्रमासाठी माजी नगरसेवक शेखर पाटील,रुपाली मंगेश पाटील, राजकुँवर शेखर पाटील इंदापूर केंद्राचे केंद्रप्रमुख सिध्दार्थ चव्हाण, इंदापूर नं 1व 2 मुख्याध्यापक जाई कोळेकर, सौ मंदाकिनी बोराटे.शिक्षक स्टाफ श्रीमती रजिया शेख. सौ. स्मिता गुंड .श्री सूर्यकांत गुंड. श्री विनय मखरे. श्री. सचिन वारे. श्री कृष्णा शिंदे.सौ. भारती बनसोडे श्रीमती पुष्पा दळवी. श्रीमती वैशाली वर्तले. सौ. ज्योती पवार. सौ. रूकसाना शेख. तसेच नितीन म्हस्के अभिजीत पाटील संकेत पाटील विनीत फडतरे निलेश शिंदे प्रकाश बलदोटा ओंकार पावसे महेश चव्हाण नितीन भोंग व प्रतिष्ठान चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रतिष्ठानचे अध्यक्ष शेखर पाटील म्हणाले स्वर्गीय मंगेश बाबा पाटील यांनी नेहमीच समाजसेवेचा वसा जपला तोच वसा पुढे घेऊन जाण्याचे काम पिढी करत आहे. यापुढेही सामाजिक वसा प्रतिष्ठानच्या माध्यमातून पुढे चालू राहील.