विजय शिंदे
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रवक्तेपदी इंदापूर तालुक्यातील शशिकांत हरिदास तरंगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे,असे पत्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रसार माध्यमांमध्ये अधिकृत भूमिका व विचार मांडण्यासाठी आपली नियुक्ती करण्यात आली असून अभ्यासपूर्ण सहभागी व्हावे तसेच कोणतेही गैरसमज अथवा वाद होणार नाहीत त्याची दक्षता घ्यावी असे पत्रात म्हटले आहे.
शशिकांत तरंगे यांची राजकीय सुरुवात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून झाली, त्यांनी धनगर समाजाच्या आंदोलनातून राज्यभर कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण केले आहे.त्यांच्याकडे अभ्यासू वक्ता म्हणून पाहिले जाते.