भाटनिमगाव येथे अखंड हरिनाम सप्ताह निमित्ताने मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन.

विजय शिंदे 

इंदापूर तालुक्यातील भाटनिमगाव येथे अखंड हरिनाम सप्ताह निमित्ताने शनिवार (१७) सकाळी नऊ वाजता मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायणाचे हे पंधरावे वर्ष असून सालाबाद प्रमाणे याही वर्षी रक्तदान शिबिर व मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले असल्याची माहिती व्यासपीठ चालक ह भ प संतोष मगर महाराज यांनी दिली.

यावेळी रक्ताचे प्रमाण व रक्तातील १८ तपासण्या, कॅन्सर संदर्भातील रक्ताच्या तपासण्या, थेलेसिमिया आजारासंबंधातील रक्ताच्या तपासण्या करण्यात येणार आहे. यावेळी अनुभवी डॉक्टरांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here