विजय शिंदे
इंदापूर तालुका बार असोसिएशन संघटना २०२४-२५ ची नूतन कार्यकारणी जाहीर झाली या कार्यकारिणीचा सत्कार सोनाई पॅलेस येथे सोनाई परिवाराचे अध्यक्ष दशरथ(दादा) माने व पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी नवनियुक्त कार्यकारिणीला सोनाई परिवाराच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी अध्यक्षपदी निवड झालेले ॲड. गिरीश शहा, उपाध्यक्ष ॲड. भारत कडाळे साहेब व ॲड. शरद घोगरे, सचिव ॲड. योगेश देवकर साहेब, खजिनदार ॲड. सोमनाथ फुलसुंदर , ग्रंथपाल ॲड.भालचंद्र कुलकर्णी, महिला प्रतिनिधी ॲड. तेजस्वी वीर, सदस्य ॲड. आप्पासाहेब शिंदे उपस्थित होते.
यांच्यासह पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट उपाध्यक्षपदी निवड झालेले ॲड. माधवराव शितोळे देशमुख, वनसंरक्षक पुरस्कार विजेते ॲड. सचिन राऊत यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट तालुका अध्यक्ष ॲड. तेजसिंह पाटील, कार्यध्यक्ष महारुद्र पाटील, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य अमोलशेठ भिसे, पुणे जिल्हा सामाजिक न्याय अध्यक्ष सागर बाबा मिसाळ, ज्येष्ठ ॲड. कृष्णाजी यादव, ॲड. मनोहर चौधरी व इंदापूर बार असोसिएशनचे अन्य सदस्य उपस्थित होते