विजय शिंदे
विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. युती आणि आघाडीमध्ये ३-३ पक्ष असल्यानं उमेदवारी मिळवण्यात चांगलीच चुरस आहे. एकाच जागेवर दोन दिग्गज उमेदवारांमध्ये स्पर्धा असलेले अनेक मतदारसंघ राज्यात आहेत.
महायुतीमध्ये इंदापूर विधानसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडे जाते की भाजपकडे जाते हे अद्याप ठरलेले नाही. मात्र लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी झालेल्या चर्चेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्याला शब्द दिलेला आहे असे माजी मंत्री भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी भर भाषणात सांगितलं. हर्षवर्धन पाटील यांच्या विधानामुळे इंदापूरचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार दत्तात्रय भरणे यांचे टेन्शन नक्कीच वाढलं आहे.
इंदापूर मतदारसंघातील बावडा गावात हर्षवर्धन पाटलांच्या कार्यकर्त्यांनी इंदापूर तालुका विकास आघाडीची पहिली शाखा स्थापन करत त्याचे संकेतही दिले होते. त्यानंतर इंदापूर विधानसभा निवडणुकीत नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कार्यकर्त्यांनी इंदापूर तालुका विकास आघाडीची पहिली शाखा स्थापन केली आहे तर इंदापूर तालुका विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली असून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसापर्यंत इंदापूर तालुक्यात १०० विकास आघाडीच्या शाखा उघडून विधानसभेची तयारी करण्यात येणार आहे.
इंदापूर तालुक्यात ७० हुन अधिक गावात इंदापूर तालुका विकास आघाडी च्या शाखा स्थापन झाल्या असून २१ ऑगस्टपर्यंत शंभरहून अधिक शाखा स्थापन होतील अशी माहिती विकास आघाडी चे समन्वयक अजित खबाले यांनी दिली.
इंदापूर तालुका विकास आघाडीच्या विविध शाखा उद्घाटन कार्यक्रम..
रविवारी दिनांक १८ऑगस्ट २०२४
१) संध्याकाळी ०४.००
अवसरी
२)संध्याकाळी ०४.३० वा.
बिडशिंगे
३)संध्याकाळी ५.०० वा.
भाटनिमगाव.
४)संध्याकाळी ०५.३० वा.
बाभुळगाव
५)संध्याकाळी ०६.०० वा.
गलांडवाडी २
६) संध्याकाळी ०६.३० वा
शहा
७) संध्याकाळी ०७.०० वा
महादेवनगर