भाटनिमगाव येथे विकास आघाडीच्या शाखेची स्थापना.!!

विजय शिंदे 

इंदापूर तालुक्यातील भाटनिमगाव येथे तालुका विकास आघाडीच्या शाखेचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाले, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील समर्थकांनी विकास आघाडीची शाखा सुरू केली असून आगामी काळात हर्षवर्धन पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवावी असे मत व्यक्त केले आहे. यावेळी हर्षवर्धन पाटील साहेब आगे बढो, लढेंगे और जितेंगे अशा घोषणा देण्यात आल्या.

यावेळी शाखेच्या अध्यक्षपदी सचिन कांबळे, कार्याध्यक्षपदी गणेश पोळ, उपाध्यक्षपदी अमीर सय्यद, बालाजी गवळी, सचिव पदी रोहन मगर, संघटक पदी प्रसाद गवळी  खजिनदारपदी अनिल पवार यांची निवड करण्यात आली आहे.

यावेळी अमोल चंदनशिवे,संचालक अमर काळकुटे,बबलू पठाण,अतुल वाघमोडे, पवन घोगरे, अमर काळे, सरपंच संदेश शिंदे, सरपंच अजित खबाले,अमोलराजे इंगळे, बंडु जाधव, बाळासाहेब भोंगळे, संदीप धनवडे,मोहन खबाले, भागवत शिंदे, नागनाथ खबाले, प्रा गणेश गवळी, राजेंद्र ढोणे, सुलतान शेख, विठ्ठल गलांडे, संतोष पवार, छगन गवळी, बापू पवार, संतोष गलांडे, मुसाभाई शेख,तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.

१९९९ साली विकास आघाडीची स्थापना..

११९९ साली माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर तालुका विकास आघाडीची पहिली शाखा भाटनिमगाव येथे स्थापन करण्यात आली होती. यावेळी शाखेचे तत्कालीन अध्यक्ष भागवत शिंदे व नंतरच्या काळात मोहन खबाले यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळली नव्याने स्थापन झालेल्या शाखेच्या अध्यक्षपदी सचिन कांबळे यांना संधी दिली आहे.

नूतन कार्यकारणीत सर्व सामान्य कुटुंबातील सर्व समाजातील तसेच हर्षवर्धन पाटील यांच्यावर निष्ठा असणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी दिली असल्याचे इंदापूर तालुका विकास आघाडीचे समन्वयक अजित खबाले यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here