विजय शिंदे
आज इंदापूर मध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी बुथ कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला आहे. याच मेळाव्या अगोदर इतर पक्षांतील व गटातील शेकडो कार्यकर्त्यांनी सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीमध्ये शरद पवार गटात प्रवेश केला आहे. या प्रवेशांमुळे इंदापूर तालुक्यामध्ये शरद पवार गटाची ताकद वाढत असून या गटाकडे युवकांचे अधिक आकर्षण आहे.
शरद पवार गटात पक्षप्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांमध्ये प्रामुख्याने सर्व कार्यकर्ते हे भवानीनगर साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील आहेत.कोणत्याही परिस्थितीत यंदा विजयाची तुतारी वाजवायची असे प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पुणे जिल्हा संपर्क प्रमुख रेडणी चे अमोल मुळे यांच्या प्रयत्नाने जाहीर प्रवेश घेण्यात आले.
यावेळी जेष्ठ नेते अशोक घोगरे,तालुकाध्यक्ष ॲड तेजसिंह पाटील, कार्याध्यक्ष महारुद्र पाटील, सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष सागर मिसाळ, युवक तालुकाध्यक्ष अनिकेत निंबाळकर, महाराष्ट्र प्रदेश युवक सचिव अरबाज शेख, बारामती लोकसभा कार्याध्यक्ष अक्षय कोकाटे, तालुका उपाध्यक्ष सुनील खाडे, तालुका सरचिटणीस सोमनाथ काळकुटे, सोशल मीडिया हिमांशू पाटील, सामाजिक न्याय तालुका अध्यक्ष संजय दुपारगुडे, सामाजिक न्याय कार्याध्यक्ष विकास खिलारे, ओबीसी तालुका सरचिटणीस दत्तात्रय रासकर उपस्थित होते