विजय शिंदे
सोनाई प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात येणार्या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह शुक्रवारी (२३ ऑगस्ट) इंदापुरात वाघ पॅलेस या ठिकाणी घेण्यात येणार असल्याची माहिती विवाह सोहळ्याचे आयोजक व जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांनी दिली.
२३ ऑगस्ट रोजी सकाळी नऊ ते अकरा वाजेपर्यंत हळदीचा कार्यक्रम ११ ते ३ भोजन तीन ते पाच वाजेपर्यंत वरांची मिरवणूक (वरदवा) साडेपाच वाजता खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील,कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार, सोनाई उद्योग समूहाचे प्रमुख दशरथ माने व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.