शहा- महादेवनगर ग्रामपंचायत सरपंच पदी स्वाती संतोष पांढरे यांची बिनविरोध निवड.

विजय शिंदे

इंदापूर तालुक्यातील शहा- महादेवनगर ग्रामपंचायत सरपंच पदी स्वाती संतोष पांढरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. सरपंच सुनीता नितीन निकम यांनी मदत पूर्व राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागी सरपंच निवडीसाठी आज शुक्रवार (२३) विशेष बैठक बोलावण्यात आली यावेळी स्वाती पांढरे यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी औदुंबर शिंदे यांनी पांढरे यांची निवड झाल्याचे जाहीर केले.

यावेळी दिलीप वामन पाटील, पुनम संतोष कडवळे, सुनिता नितीन निकम, दुर्गा ज्ञानदेव कुंभार हे ग्रामपंचायत सदस्य तसेच  ग्रामसेविका संजीवनी मराळ उपस्थित होते.

यावेळी बोलताना नवनिर्वाचित सरपंच स्वाती संतोष पांढरे म्हणाल्या माजी राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे यांच्या सक्षम नेतृत्वाखाली तसेच इंदापूर पंचायत समितीचे माजी सदस्य सतीश पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ यांना सोबत घेऊन गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार आहे.

स्वाती पांढरे यांच्या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला यावेळी गुलालाची उधळण व फटाक्याची आतषबाजी करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here