पुणे-सोलापूर जिल्ह्याच्या माध्यमातून धरणांमध्ये चार कोटी रुपयांचे मत्सबीज सोडावे;माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे पुणे सोलापूरच्या पालकमंत्र्यांना पत्र.

विजय शिंदे

उजनी धरणांमध्ये पुणे व सोलापुर जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून चार कोटी रुपयांचे मत्सबीज सोडण्यात यावे अशी मागणी मा. सहकार व संसदिय कार्यमंत्री तथा राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन  पाटील यांनी केली आहे.याबाबत माजी सहकार व संसदिय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री व सोलापुर जिल्हयाचे पालकमंत्री यांचेकडे पत्राद्वारे ही मागणी केली आहे. याबाबत पाठविलेल्या पत्रानुसार उजनी धरण हे महाराष्ट्रातील गोडया पाण्यातील मासेमारीचे एक महत्वाचे केंद्र आहे. पुणे, सोलापुर व अहमदनगर जिल्हयातील हजारो कुटुंब ही उजनी धरणातील मासेवारीवर अवलंबुन आहे. सध्या अनुकूल पर्जन्यमानामुळे उजनी धरण शंभर टक्के भरले आहे. काही दिवसांत धरणातील नदी पात्रांमध्ये सोडण्यात येणारे पाणी बंद करण्यात येईल. पुणे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सुमारे दोन कोटी रुपयांचे तर सोलापुर जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून दोन कोटी रुपयांची मत्सबीस उजनी धरणांमध्ये सोडण्यात यावीत. दोन्ही जिल्हा परिषदांच्या नियोजन समितीच्या माध्यमातून उजनी धरणांमध्ये मत्सबीज सोडल्यास उजनी धरण परिसरातील मच्छीमारांना मोठा फायदा होईल.

याबाबत बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले, उजनी धरण हे गोडया पाण्यातील मासेमारीच्या दृष्टीने एक महत्वाचे धरण आहे. धऱणांमध्ये योग्य वेळी मत्सबीज सोडल्यास पुणे सोलापुर व अहमदनगगर जिल्ह्यातील मच्छीमारांना त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होतो ही बाब विचारात घेऊन पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार व सोलापुर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना पत्र लिहुन दोन्ही जिल्ह्याच्या माध्यमातून धरणांमध्ये चार कोटी रुपयांचे मत्सबीज सोडावे अशी मागणी केली आहे. याबाबत मत्स विभागाच्या अधिकाऱ्यांशीही चर्चा झाली आहे. याबाबत निश्चित सकारात्मक निर्णयासाठी पाठपुरावा करु.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here