भाटनिमगाव (ता इंदापूर) येथील ग्रामदैवत शेख फरीद बाबा (पिरसाहेब) यात्रे संदर्भात ग्रामस्थांची बैठक संपन्न. संदल’ छबीना’ तमाशा व कुस्त्यांची तारीख ठरली.

विजय शिंदे

भाटनिमगाव (ता इंदापूर) येथील ग्रामदैवत शेख फरीद बाबा (पिरसाहेब) यात्रे संदर्भात महाशिवरात्री (८ मार्च )दिवशी सकाळी ९ वाजता ग्रामस्थांची बैठक संपन्न झाली. यावेळी सर्वानुमते सालाबाद प्रमाणे होणाऱ्या यात्रेसाठी तारीख निश्चित करण्यात आली.

२ एप्रिल रोजी संदल, ३ एप्रिल रोजी बाबाच्या घोड्यांचा छबिना व रात्री ९ वाजता महाराष्ट्रातील नामवंत असा लोकनाट्य तमाशा, दिनांक ४ एप्रिल रोजी महाराष्ट्रातील नामवंत मल्लांच्या कुस्ती आखाडा होणार आहे.

भाटनिमगाव येथील शेख फरीद बाबा दर्गा परिसरात परिचित असून दरवर्षी यात्रेचे मोठ्या उत्साहात आयोजन केले जाते. या यात्रेसाठी नामवंत असा लोकनाट्य तमाशा सादर होतो तर राज्यातील नामवंत मल्ल कुस्ती आखाड्यासाठी उपस्थित असतात, यात्रेच्या निमित्ताने फटाक्यांची आतषबाजी, विद्युत रोषणाईने परिसर उजळून जातो.या वेळी इंदापूर व पंचक्रोशीतील ग्रामस्थ दर्शनासाठी येत असतात.

यावेळी सरपंच,यात्रा कमिटीचे पंच,पोलीस पाटील, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here