विजय शिंदे
शासकीय विभागांमध्येच नव्हे तर महामंडळे, प्रकल्प, जिल्हा परिषद व वाणिज्य विभाग स्थानिक निधी लेखापरीक्षा कार्यालय इत्यादी ठिकाणी महाराष्ट्र वित्त व लेखा संवर्गातील अधिकारी लेखा विषयक व वित्तीय जबाबदारीची कामे चोखपणे पार पाडत आहेत जमा रक्कमांचे लेखांकन योग्य रीतीने होते की नाही शासकीय तिजोरीतून होणाऱ्या खर्चावर नियंत्रण या संवर्गाकडून केले जात असल्यामुळे संवर्गातील सहाय्यक लेखाधिकारी यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे मत महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट ब संघटनेचे अध्यक्ष श्री दीपक धनगर यांनी व्यक्त केले.
दिनांक 24 ऑगस्ट रोजी बहुउद्देशीय सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे म. वि.ले. से.गट ब राजपत्रित संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली यावेळी व्यासपीठावर श्री दीपक धनगर अध्यक्ष, श्री शिवाजी खराडे उपाध्यक्ष, श्री योगेश दांदळे प्रमुख कार्यवाह, श्री पतंगे उपाध्यक्ष, श्री राहुल गांगर्डे कार्यवाह, श्रीमती रक्षा मस्कर कार्यवाह हे उपस्थित होते. यावेळी श्री निलेश बोंगिरवार यांची राज्य समन्वयक पदी निवड करण्यात आली.यावेळी संपूर्ण राज्यभरातून सहाय्यक लेखाधिकारी व जिल्हा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संवर्गातील अधिकाऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी तसेच जुन्या पेन्शन सारख्या जिव्हाळ्याच्या मागण्या शासनासमोर प्रभावीपणे मांडण्यासाठी संघटना नेहमीच अग्रभागी असून प्रशासनास नेहमीच संघटनेने कामकाजात गतिमानता आणण्यासाठी सहकार्याची भूमिका बजावलेली असल्याचे मत संघटनेचे उपाध्यक्ष श्री शिवाजी खराडे यांनी आपल्या प्रस्ताविका मध्ये व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती सुजाता भिडे व मनीषा कुंभार यांनी केले तर आभार प्रदर्शन पुणे जिल्हा अध्यक्ष श्रीमती सीमा सातपुते यांनी केले कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी महसूल संघटनेचे श्री विनायक राऊत यांचे विशेष सहकार्य लाभले तर पुणे विभागीय अध्यक्ष श्री प्रशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सहाय्यक लेखाधिकारी यांनी मोलाची भूमिका पार पाडली.