भरतशेठ शहा मित्रपरिवार इंदापूर यांच्यावतीने इंदापूर शहरात भव्य दहीहंडीचे आयोजन.

विजय शिंदे

भरतशेठ शहा मित्रपरिवार इंदापूर यांच्यावतीने गुरुवार २९ ऑगस्ट रोजी इंदापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती पोलीस स्टेशन समोर दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले आहे. नेहमी प्रमाणे इंदापूर नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष भरत शहा, मुकुंद शहा,माजी नगराध्यक्ष अंकिता शहा इंदापूर शहरात सामाजिक उपक्रम राबवत असतात.

गोंविदा रे गोपाळा…”अरे बोल बजरंग बली की जय…’असे सूर कानावर पडत इंदापूर शहरातील दहीहंडीतील संघ या उत्साहात सहभागी होणार आहेत. गोपाळ नित्यनेमाने गेल्या महिना दोन महिन्यापासून प्रॅक्टिस करतायत.उंच उंच मनोरे लावण्यासाठी एकमेकांच्या साथीने तरुणाई अथक प्रयत्न घेत आहे.

यावेळी सिने अभिनेत्री मानसी नाईक उपस्थित राहणार असून शहर व परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here