विजय शिंदे
रोहितदादा वसंत मोहोळकर चषक २०२४ भव्य दहीहंडी उत्सव समिती यांच्यावतीने ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता जंक्शन आनंदनगर येथे दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले आहे.
दरवर्षी प्रमाणे गोंविदा रे गोपाळा…”अरे बोल बजरंग बली की जय…’असे सूर कानावर पडत जंक्शन आनंदनगर येथे शेकडो दही हंडी संघ या उत्साहात सहभागी होणार आहेत.
यावेळी सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी प्रमुख आकर्षण असणार आहे. त्याचबरोबर इतरही काही अभिनेत्री कलाकार उपस्थित राहणार आहेत.परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.