विजय शिंदे
महाराष्ट्रात महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकीसाठी एकत्रितपणे सामोरी जाणार आहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार , काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जागा वाटपासाठी बैठका सुरु आहेत.जागावाटपावर चर्चा सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेसनं एक पाऊल पुढं टाकलं आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून पक्षानं अर्ज मागवले आहेत. इच्छुकांनी ५ सप्टेंबरपर्यंत अर्ज जिल्हाध्यक्षांमार्फत अर्ज सादर करावेत, असं आवाहन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांननी केलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षातर्फे आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून आगामी विधानसभा निवडणूक- २०२४ लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी जिल्हाध्यक्षांमार्फत अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. हे अर्ज ५ सप्टेंबर २०२४ पर्यंत प्रदेश कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे.
आगामी काळात राज्यातील विधानसभा निवडणूक होणार आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्यासाठी ” महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार ” पक्ष मोठ्या ताकदीने घटक पक्षांसहित एकत्रितपणे निवडणुकीला सामोरा जाणार आहे. त्याअनुषंगाने पक्षातर्फे निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांकरिता जिल्हाध्यक्षामार्फत अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ५ सप्टेंबरपर्यंत प्रदेश कार्यालयास सादर करावयाचे आहेत. विहीत वेळेत दाखल केलेले परिपूर्ण अर्जच पक्षाची उमेदवारी निश्चित करताना विचारात घेण्यात येणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते प्रवेश करण्याची देखील शक्यता आहे
इंदापूर विधानसभेसाठी या नावांची चर्चा..
इंदापूर विधानसभेसाठी राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षातून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे तसेच सोनाई परिवाराचे संचालक व पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने हे प्रमुख इच्छुक आहेत. त्याचबरोबर तालुका अध्यक्ष तेजसिंह पाटील, ज्येष्ठ नेते अशोक घोगरे, कार्याध्यक्ष महारुद्र पाटील, इंदापूर नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष भरत शहा,अमोल भिसे, सागर मिसाळ इच्छुक असल्याची चर्चा आहे.