विजय शिंदे
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडत आहेत. निवडणुकांच्या आधी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये अनेक जण प्रवेश करीत तुतारी हाती घेण्यास उत्सुक असल्याची जोरदार चर्चा आहे.अशातच मंगळवारी (दि. 27) मांजरीत भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे या चर्चांना अधिकच उधाण आले आहे.
अशातच आता इंदापुरात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी सुरू केले आहे. हर्षवर्धन पाटील यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश निश्चित मानला जात असून इंदापूर तालुक्याच्या जनतेची झाली तयारी हर्षवर्धन भाऊ तुम्ही आता वाजवा तुतारी अशा पद्धतीचा व त्यावर तुतारी चिन्ह असलेला बॅनर इंदापूर शहरात लागला आहे.