विजय शिंदे
पर्यावरणाचा ढासळलेला समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड उपक्रम काळाची गरज असल्याचे मत इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन खुडे यांनी व्यक्त केले.श्रावणी मासानिमित्त शहा गावचे उपसरपंच सामाजिक कार्यकर्ते दिलीप पाटील यांच्या संकल्पनेतून काटी -वडापुरी जिल्हा परिषद गटातील वडापुरी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बेलाच्या वृक्षाचे वाटप करण्यात आले यावेळी ते बोलत होते.
यावेळी बोलताना गटविकास अधिकारी सचिन खुडे म्हणाले पर्यावरणाचा प्रश्न सर्व जगाला भेडसावत आहे. वृक्ष संवर्धन ही आजच्या काळाची मोठी गरज आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण व त्यांचे मानवाने आपल्या अतिरेकी महत्वाकांक्षेसाठी सिमेंटची जंगलं वसवली, मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल केली. याचाच परिणाम ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्न आज जगाला भेडसावत आहे. वातावरण बदलामुळे पावसाची अनिश्चीतता वाढलीय. वाढती लोकसंख्या, वाहनांचा अति वापर यामुळे निर्माण होणा-या प्रदूषणामुळे श्वास घेणे कठीण झालेले आहे. शुध्द हवा, ऑक्सिजन हवा असेल तर झाडांशिवाय पर्याय नाही. वृक्ष आपल्याला फक्त पाने, फुलेच देत नाहीत, तर आपल्याला जगण्याची उर्जा देतात.
यावेळी दिलीप पाटील, महेश शिर्के, दादासाहेब तोबरे, भागवत काटकर, ग्रामसेवक नंदराज चंदनशिवे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक व पालक उपस्थित होते.दिलेल्या वृक्षाचे संवर्धन करणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करणार असल्याचे यावेळी दिलीप पाटील म्हणाले.