विजय शिंदे
पुणे शहर व परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने उजनी धरणातून भीमा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे, यामुळे भीमा नदीला आलेल्या पुरात भाटनिमगाव भांडगाव व परिसरातील शेती पिके पाण्यात गेली आहेत पुराच्या पाण्यात अधिक काळ राहिलेल्या पिकांनी दम तोडला आहे.
सदर शेती पिकांसाठी शासनाने पंचनामा करून मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकरी समाधान भोसले यांनी केली आहे.
यावेळी बोलताना भोसले म्हणाले पूर ओसरेल तसे कुजलेल्या पिकांचे भयाण चित्र आमचे काळीज पिळवटून टाकणारे आहे. भीमा नदीला आलेल्या पुराने शेतकऱ्यांच्या व चारा पिके नष्ट झाल्याने जनावरांच्या तोंडचा घास हिरावून घेतला आहे.