विजय शिंदे
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे शुक्रवार दिनांक ३० ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजेपासून बावडा येथील रत्नाई निवासस्थानी कार्यकर्त्यांशी सुसंवाद साधणार आहेत.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे इंदापूर विधानसभेसाठी महायुती कडून इच्छुक आहेत युतीतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामुळे ते भाजपमध्ये नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. ते लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा इंदापूर तालुक्यासह राज्यभर आहे. या भेटीदरम्यान ते समर्थक व नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेत असून पक्षप्रवेशा संदर्भात काय भूमिका घेताय हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
हर्षवर्धन पाटील हे नेहमीप्रमाणे सुसंवाद मेळावा घेत असले तरीही चालू घडामोडी वर या मेळाव्याला अधिक महत्त्व आले आहे.