विजय शिंदे
हर्षवर्धन पाटील हे माझे फार जवळचे मित्र आहेत,त्यांनी माझ्याबरोबर काम केलं आहे २०१९ साली लोकसभा निवडणुकी वेळी माझ्यासमोर अजित पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांना इंदापूर जागेबाबत शब्द दिला परंतु तो पाळला गेला नाही त्यामुळे ते नाराज झाले, त्यांनी मनाविरुद्ध जाऊन कोणताही इलाज नसल्याने काँग्रेस पक्ष सोडला त्यावेळी मला खूप दुःख झाले परंतु त्यांची खूप मोठी अडचण झाली होती. इंदापूर विधानसभा मतदारसंघ हा बारामती लोकसभा मतदारसंघात येतो ती जागा जर काँग्रेस पक्षाला सुटली तर हर्षवर्धन पाटील यांच्यासह आम्ही स्वीकार करू असे मत माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी झी २४ तास या वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केले.
यावेळी बोलताना चव्हाण म्हणाले हर्षवर्धन पाटील यांच्यासोबत अनेक वर्ष काम केले त्यांनी संसदीय कार्य, सहकार मंत्रीपदी काम केले आहे. काँग्रेस पक्ष सोडताना त्यांचा नाईलाज होता, शेवटी राजकीय करियर सोडून संन्यास घेऊन चालत नाही काहीतरी निर्णय घ्यावा लागतो यातून त्यांनी निर्णय घेतला, हर्षवर्धन पाटील यांना पक्ष सोडावा लागला याचे मला खूप दुःख झाले होते. अजित पवार यांनी दिलेले आश्वासन पाळले नाही ते दुखावले शेवटी राजकीय करियर सोडून देणे किंवा राजकीय संन्यास घेणे हा प्रश्न त्यांच्यासमोर होता. त्यांना भाजपने जे आश्वासन दिले होते ते पूर्ण झाले नाही, आता ते काय निर्णय घेतील हे मला माहित नाही आणि असले तरी मी जाहीरपणे सांगणार नाही अशी टिप्पणी चव्हाण यांनी केली.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानाने मात्र अजित पवार दिला शब्द पाळत नाहीत अशी चर्चा आता इंदापुरात पुन्हा नव्याने सुरू झाली आहे.