विजय शिंदे
एखादा नेता पक्षात घेताना त्या ठिकाणची स्थानिक परिस्थिती ज्यांनी मदत केली त्या सहकाऱ्यांचे मत, येणाऱ्या नेत्याची सामाजिक व त्या ठिकाणची गरज हे लक्षात घेऊन भविष्यात प्रवेश दिले जातील असे मत राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले त्यांनी कोल्हापूर येथे पत्रकारांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व इतर काहीजण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात येणार असल्याची चर्चा आहे तुम्ही त्यांना सामील करून घेणार का.?असा प्रश्न विचारण्यात आला यावेळी ते म्हणाले. त्या ठिकाणची परिस्थिती व स्थानिक कार्यकर्त्यांची मते विचारात घेऊन निर्णय घेतले जातील.
महायुतीत इंदापूरची जागा अजित पवार गटाला मिळणार असल्याने भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची कोंडी झाली आहे. हर्षवर्धन पाटील यांनी तुतारी गटात प्रवेश करावा, अशी मागणीही त्यांच्या कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.
यातच हर्षवर्धन पाटील यांची शरद पवारांसोबतचही चर्चा झाल्याची माहिती समोर आलीय. त्यामुळे हर्षवर्धन पाटील भाजप सोडणार का ? अशा चर्चा मतदारसंघात गेल्या काही दिवसापासून सुरू झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर खा शरद पवार यांना विचारल असता त्यांनी मोठं विधान केलेय.