विजय शिंदे
रोहितदादा वसंत मोहोळकर चषक २०२४ भव्य दहीहंडी उत्सव निमित्ताने इंदापूर तालुक्यातील जंक्शन (आनंदनगर) येथे भव्य दहीहंडीचे आयोजन करण्यात आले असून सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तसेच डान्सर बैलगाडा फेम जुई शेरकर व इतरही कलाकारांच्या उपस्थितीत दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येणार आहे.
यावेळी मोहोळ तालुक्याचे आमदार यशवंत माने, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन अविनाश घोलप, माजी चेअरमन पृथ्वीराज जाचक, निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे व्हा चेअरमन कांतीलाल झगडे, कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे व्हा चेअरमन भरतशेठ शहा, बाजार समितीचे सभापती विलास माने, कर्मयोगी चे संचालक वसंत मोहोळकर, अर्बन बँकेचे चेअरमन देवराज जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य मोहन दुधाळ, समता परिषदेचे तालुका अध्यक्ष राहुल जाधव यासह सर्वच क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
बँक ऑफ बडोदा शेजारी जंक्शन (आनंदनगर) येथील दहीहंडी उत्सव पाहण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आनंद नगरचे सरपंच तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती रोहित मोहोळकर यांनी केले आहे.