विजय शिंदे
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे इंदापूरचे विधानसभा निवडणूक लढवणार आहेत त्यामुळे कार्यकर्त्यांनी कोणताही संभ्रम ठेवू नये अशी भूमिका पुणे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या अंकिता पाटील ठाकरे यांनी आज जाहीर केले आहे.
यावेळी एम एच १२ सोबत बोलताना अंकिता पाटील ठाकरे म्हणाल्या माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे इंदापूर तालुक्यात फार मोठे कार्यकर्त्यांचे जाळे आहे संस्थात्मक कार्य आहे मंत्री पदाच्या कार्यकाळात इंदापूर तालुक्यात अनेक विविध विकासकामे त्यांनी केले आहेत आताच्या राजकीय परिस्थितीवर संभ्रम निर्माण केला जात आहे परंतु हर्षवर्धन पाटील हे येणारी विधानसभा निवडणूक लढवणार आहेत त्यामुळे त्यांचा पक्ष चिन्ह हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.
अंकिता पाटील ठाकरे यांच्या या भूमिकेमुळे महायुती तणाव निर्माण होणार हे स्पष्ट झाले असून येणाऱ्या काही दिवसात इंदापूर विधानसभे संदर्भात निवडणूक दुरंगी होणार की तिरंगी हे मात्र स्पष्ट होणार आहे.