मगर ॲक्सिडेंट व डोळ्यांचे हॉस्पिटलचे कृष्णदृष्टी ॲडव्हांस आय केअर सेंटर च्या प्रथम वर्धापनदिन निमित्ताने आयोजित कॅम्पला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद.

विजय शिंदे

विजय शिंदे

इंदापूर शहरातील नामवंत अशा मगर ॲक्सिडेंट व डोळ्यांचे हॉस्पिटलचे कृष्णदृष्टी ॲडव्हांस आय केअर सेंटर च्या प्रथम वर्धापनदिन निमित्ताने, महाशिवरात्री चे औचित्य साधून शुक्रवार दिनांक ८ मार्च रोजी सकाळी १० वाजता मधुमेही व रक्तदाब रुग्णांसाठी डोळ्याच्या मागील पडद्याचा (रेटिना) मोफत स्कॅन कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या प्रमाणात रुग्णांचा प्रतिसाद लाभला.

यावेळी डॉक्टर जयश्री गटकूळ,महिला पोलीस कर्मचारी आरा जाधव व कल्याणी खंडागळे उपस्थित होत्या, कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन डॉ राम अरणकर, डॉ पूजा वाबळे,डॉ अपर्णा काटे, जयश्री खबाले, रतन पाडुळे, निर्मला जाधव उज्वला गायकवाड यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी अनुराधा गारटकर, उमा इंगोले, हेमा माळुंजकर, सुनीता वाघ, रेखा जोशी, रहना शेख,शारदा नागपुरे, कांचन बानकर, कल्पना भोर, अर्चना शिंदे, सुनंदा आरगडे उपस्थित होत्या.

कार्यक्रमाची प्रस्तावना आराध्या मगर यांनी केली तर कार्यक्रमाचे आयोजन डॉ गीता मगर यांनी केले,या वेळी उपस्थित मान्यवरांचे आभार डॉ समीर मगर यांनी मानले.

या साठी अरविंद नेत्रालय मदुराई येथील अनुभवी दृष्टीपटल(रेटिना) तज्ञ डॉ. पूजा वाबळे – पवार (MBBS., DNB (Ophthal) FVRS, FAEH) यांच्या द्वारा मोफत दृष्टी पटल तपासणी व मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here