ड्रेनेज च्या कामासाठी उखाडलेला रस्ता पुन्हा डांबरीकरण करून देऊन पूर्ववत करा.

विजय शिंदे 

इंदापूर शहरांमधील शहा सांस्कृतिक भावना पासून वडार गल्ली कडे जाणाऱ्या रस्त्याने दत्तनगर कडून येणारे ड्रेनेज चे काम चालू आहे. यासाठी रस्त्याच्या मध्यभागातून सदरचा डांबरी रस्ता उखडला असल्याने नागरिकांना या रस्त्याने जाताना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने सदरचा रस्ता तातडीने पूर्ववत करण्याची मागणी इंदापूर शहरातील नागरिकांनी इंदापूर नगरपालिकेकडे निवेदनाद्वारे केली आहे.

इंदापूर शहरात दत्तनगर कडून येणाऱ्या ड्रेनेज चे काम शहा सांस्कृतिक भावना समोर सुरू आहे. हे काम चालू असताना वडार गल्लीकडे जाणारा पक्का डांबरी रस्ता उखडला गेला आहे. यातून निघणारा मुरूम व मातीचे रस्त्याच्या दोन्ही बाजूला भराव टाकले आहेत. त्यामुळे या रस्त्याने प्रवास करणाऱ्या लोकांना प्रवास करताना त्रास होत आहे.

तसेच श्रीराम सोसायटी, श्रीरामनगर,पडस्थळ,चिंधादेवी इत्यादी गावाकडून मुख्य मार्गाने प्रवास न करता अनेक जण या मार्गाचा वापर करतात. त्यामुळे लोकांची गैरसोय टाळण्यासाठी तातडीने हा रस्ता पूर्ववत डांबरीकरण करून देण्यात यावा अशी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.

यावेळी स्वप्निल सावंत, विशाल रणवरे,सचिन परबते, सागर पवार ,रुपेश कुस्पे,मनोज शिंदे, अविनाश चौधरी आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here