शिक्षक दिनानिमित्त राबविलेल्या “या” उपक्रमाचे सर्वत्र कौतुक

विजय शिंदे

इंदापूर येथील नारायणदास रामदास हायस्कूलमधील १९९६च्या १०वी अ तुकडीतील माजी विद्यार्थ्यांनी आपल्या सामाजिक उपक्रमाची संकल्पना १०व्या वर्षीही कायम ठेवत शहरातील रणछोडदास कल्याणदास शहा विद्यालय येथे विद्यार्थ्यांसाठी २५ बाक, एलईडी टिव्ही व दोन स्वच्छतागृह युनिट बांधून दिले. शिक्षक दिनानिमित्त राबविलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

इंदापूर येथील नारायणदास रामदास हायस्कूलमधील १९९६च्या १०वी अ तुकडीतील माजी विद्यार्थ्यांनी आपल्या सामाजिक उपक्रमाची संकल्पना १०व्या वर्षीही कायम ठेवत शहरातील रणछोडदास कल्याणदास शहा विद्यालय येथे विद्यार्थ्यांसाठी २५ बाक, एलईडी टिव्ही व दोन स्वच्छतागृह युनिट बांधून दिले.  हे माजी विद्यार्थी गेल्या १० वर्षांपासून एकत्र येत शहरातील विविध शाळांना उपयुक्त साहित्य देत सामाजिक बांधिलकी जपत आहेत. याचाच एक भाग म्हणून या विद्यार्थ्यांनी शहा विद्यालयातील विद्यार्थ्यांची गरज ओळखून विद्यालयास मदत केली. यानिमित्ताने सेवा निवृत्त शिक्षक बाबासाहेब घाडगे, गोरक्षनाथ ठोंबरे,जनार्दन देवकर, विजय भांबरे, आर.ए. जाधव, मुख्याध्यापक संजय सोरटे, विकास फलफले, लहू जाडकर, सुनील माळी आदींचा सन्मान करण्यात आला. दरम्यान, सचिन शेंडे, उदय शहा, मनोज मोरे यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी इंदापूर तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड. गिरीश शहा,इंदापूर अर्बन बँकेचे संचालक मच्छिंद्र
शेटे-पाटील, अविनाश कोथमिरे आदी
उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी
अमर गायकवाड, पद्मसिंह पाटील, बाळासाहेब भिसे, सुहास राऊत, सुरेश मोरे, भीमाशंकर जाधव, अविनाश बानकर, नागेश चोरमले आदींनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नितीन शहा यांनी केले.तर आभार सकाळचे वितरण प्रतिनिधी भीमाशंकर जाधव यांनी मानले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here