विजय शिंदे
विधानसभा निवडणुकीसाठी महायुती लवकरच पहिल्या 100 जागांचे उमेदवार जाहीर करणार असल्याची माहिती समोर येत आहे. ज्या जागांवर कुठलेही वाद नाहीत, अशा जागांवर तिथल्या उमेदवारांना तयारीला लागण्याच्या सूचना दिल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे.
पहिल्या 100 उमेदवारांमध्ये भाजपचे 50 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 25 आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या 25 उमेदवारांचा समावेश असेल. यातल्या अजित पवारांच्या 25 जागांवरचे उमेदवार निश्चित झाले आहेत.
राष्ट्रवादीकडून कुणाला तिकीट?
अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून सध्या असलेल्या सर्व मंत्र्यांना पुन्हा तिकीट मिळणार आहे. तसंच दोन टर्म किंवा त्यापेक्षा जास्त वेळा आमदार असलेल्या आमदारांची तिकीटही निश्चित झाली आहेत. पहिल्यांदा आमदार झालेल्या आमदारांपैकी मावळचे सुनिल शेळके तर रायगडमधून आदिती तटकरे यांचीही नावं या यादीत आहेत.
दुसरीकडे नवाब मलिक यांच्यासह वादात असलेल्या आमदारांच्या जागेवर उमेदवार निश्चितीबद्दल चर्चा बाकी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
अजितदादांचे निश्चित झालेले आमदार कोण?
बारामती : अजित पवार
आंबेगाव :दिलीप वळसे पाटील
येवला : छगन भुजबळ
वाई: मकरंद आबा पाटील
परळी : धनंजय मुंडे
रायगड : आदिती तटकरे
मावळ : सुनिल शेळके
अहेरी : धर्मराव बाबा आत्राम
खेड : दिलीप मोहिते
जुन्नर : अतुल बेनके
उदगीर : संजय बनसोड
दिंडोरी: नरहरी झिरवळ
पुसद : इंद्रनील नाईक
पिंपरी : अण्णा बनसोडे
इंदापूर: दत्ता भरणे
कळवण: नितीन पवार
अंमळनेर : अनिल पाटील
कागल: हसन मुश्रीफ
अहमदनगर :संग्राम जगताप
वडगाव शेरी : सुनिल टिंगरे